कोल्हापूर: ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यावरील हल्ल्याला तीन महिने पूर्ण झालेत. मात्र हल्लेखोरांचा शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरलेत.
त्यातच हल्ल्याचा तपास सुरू असताना गृहखात्यानं अवघ्या एका महिन्यात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांची पुणे सीआयडीकडे आणि हल्ल्याचे तपास अधिकारी अंकित गोयल यांची वर्धा पोलीस अधीक्षकपदी बढतीनं बदली करण्यात आलीय.
त्यामुळं या हल्यांच्या तपासासंदर्भात तपासावर मर्यादा येण्याची भीती व्यक्त केली जातेय. त्यामुळं गोविंदराव पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा छडा लावण्यासाठी सरकार गंभीर नाही का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.