पुणे : शहरात बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. याप्रकरणी ३ महिला आणि एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
महापालिकेच्या कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयासमोर ही कारवाई करण्यात आली. या बाळाची विक्री ३ लाख रुपयांत करण्यात येणार होती. हे बाळ केवळ एक महिन्यांचे आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये दीप्ती खरात ( खडकवासला, पुणे) लतिका पाटील (डोंबिवली, ठाणे), आशा अहिरे ( उल्हासनगर) केशव धेंडे ( महंमदवाडी, पुणे) यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांसडून अधिक तपास सुरु आहे.