अकोला : येथील गुलजारपुरा भागात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. रात्री येथे दोन गटांत झालेल्या वादात मनोज धुमाणे या युवकाची हत्या करण्यात आली. तर मनोजचा मित्र असलेला जय वाडेकर नामक तरूण यामध्ये गंभीर जखमी झालाय.
काल रात्री आठ वाजताच्या सुमारास मनोज आणि त्याचा मित्र जयशी काही तरुणांची बाचाबाची झाली होतीय. त्यानंतर दोन्ही गटांना शांत करण्यात आलेय. मात्र, रात्री १० वाजताच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. दुसऱ्या गटातील आठ ते दहा जणांच्या जमावाने मनोज आणि त्याच्या मित्रावर तलवारी आणि पाईपने हल्ला केला. यामध्ये जखमी मनोजचा एका खासगी रुग्णालयात मृत्यू झालाय. तर गंभीर जखमी असलेल्या जय वाडेकर याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.
दरम्यान, रात्रीपासून जुने शहर भागात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त लावण्यात आलाय. यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक बोलविण्यात आली आहे. पोलिसांनी रात्रीपासून 'कोंबिंग ऑपरेशन' राबविलेय. मात्र, यामध्ये एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही.
आज दुपारी साडेबाराला मनोजवर मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या अकोल्यातील जुने शहर भागातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव मात्र कायम आहे. मात्र या दोन गटांतील वादाचे स्पष्ट झालेले नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.