नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची राष्ट्रीय सेवा संघ मुख्यालयात भेट घेतली. त्यांनी नोटबंदीमुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये ही आमची इच्छा, ही सर्वांचीच इच्छा आहे. याबाबत चर्चा उद्धव यांनी केली. जवळपास ४० मिनिटे चर्चा बंद दाराआड झाली. त्यामुळे अधिक तपशिल मिळू शकला नाही.
केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर उद्धव यांनी सामान्यांची बाजु घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. तो सुरुच आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलीच्या लग्नासाठी उद्धव नागपुरात आहेत. त्यावेळी त्यांनी ही संधी साधून भागवत यांची भेट घेतली. यावेळी राजकारणाबाबतही चर्चा केली.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अधिक मिळू शकली नाही. मात्र, नोटाबंदी आणि त्यामुळे देशातील सामान्य जनतेला सहन करावा लागत असलेला त्रास या विषयांवर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.