नागपूर : नागपूरात एक धक्कादायक घटना घडलीये. नागपूरातील लता मंगेशकर रुग्णालयात शुक्रवारी रात्री एका महिलेने 'जेनेटिक डिसॉर्डर' असलेल्या एका 'हर्लेक्विन' बाळाला जन्म दिला.
हे बाळ ८ महिन्यांचे असून त्याच्या शरीरावर त्वचेचा एकही थर नाहीये. बाळावर सध्या डॉक्टर यश बानाइत यांच्यासह इतर डॉक्टर उपचार करत आहे.
काय आहे हर्लेक्विन
'हर्लेक्विन' हा एक गंभीर जनुकीय दोष आहे. अशी केस ३ लाखांमध्ये एखादीच असते. या दोषामुळे व्यक्तीच्या त्वचेवर परिणाम होतो. जन्मजात अशा बाळांना त्वचा राहत नाही. अशा मुलांच्या त्वचेची सातत्याने खूप काळजी घेणे गरजेचे असते. मात्र हे बाळ किती दिवस वा किती काळ जगेल हे सांगता येत नाही.
भारतातील ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी पाकिस्तानमधे अशा प्रकारचे बाळ जन्माला आले होते.