सांगली : जिल्ह्यातल्या खिरवडे गावातल्या दलित समाजावर पिण्याच्या पाण्यासाठी अघोषित बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. या विषयाला वाचा फोडल्यानंतर दलित समाजाला न्याय मिळाला.
दलित वस्तीसाठी मंजूर असलेल्या विशेष घटक पाणी योजनेला गावातले लोक विरोध करत होते. या प्रकाराला झी मीडियाने वाचा फोडली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने खिरवडे गावातल्या पाणी प्रश्नी तातडीने निर्णय घेत मंजूर योजनेचं पाणी दलित समाजाला मिळेल असे आदेश दिलेत.
पर्यायी विहिरीतून गावातल्या विहिरीत पाणी सोडण्यात येईल, तसंच जुन्या विहिरीतूनच गावातल्या सर्वांना पाणी देण्यात येईल, असे आदेश दिले आहेत. सांगली इथे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषदेते मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत हा निर्णय़ घेण्यात आलाय
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.