मनसेच्या परीक्षा ‘स्टंट'वर, विरोधकांचे ‘टॉन्ट’!

महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेण्याच्या मनसेच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी ताशेरे ओढलेत…. मनसेची परीक्षा म्हणजे स्टंट असल्याची टीका शिवसेनेनं केलीय. तर अशा परीक्षांची गरज नसल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलंय…. काँग्रेसनंही मनसेच्या परीक्षेच्या फंड्यावर टोलेबाजी केलीय….

Updated: Nov 22, 2011, 02:30 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेण्याच्या मनसेच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी ताशेरे ओढलेत…. मनसेची परीक्षा म्हणजे स्टंट असल्याची टीका शिवसेनेनं केलीय. तर अशा परीक्षांची गरज नसल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलंय…. काँग्रेसनंही मनसेच्या परीक्षेच्या फंड्यावर टोलेबाजी केलीय….

पारंपरिक राजकारणाला छेद देत नवनिर्माणाची घोषणा करणा-या मनसेनं आता लेखी परीक्षेद्वारे उमेदवार निवडीचा फंडा जाहीर केलाय… मनसेच्या या पाठशालेत भरती होण्यासाठी गर्दी होत असली तरी फायनल एक्झाममध्ये पास कोण होणार, हे जाहीर करण्याचे सर्वाधिकार राजसरांनी स्वतःकडेच ठेवलेत. अर्थात, या परीक्षा प्रकरणाला इतर राजकीय पक्षांनी स्टंटबाजीच ठरवलंय.

आता, पोलिटिकल मायलेज मिळवण्यासाठी या परीक्षा होताहेत, की कल्याण-डोंबिवली महापालिकेतल्या मनसेच्या नगरसेवकांच्या सुमार कामगिरीमुळे, हे राज ठाकरेंच जाणो… अर्थात, आजवर रस्त्यांवर राड्यांमधून नवनिर्माणाची भाषा करणा-या पक्षानं आपल्या उमेदवारांना हातात कागद-पेन धरायला लावलंय, हेही तसे वाईट नाही.(नसे थोडके) त्यामुळेच, जनतेच्या परीक्षेत मनसेला किती मार्क मिळतात, यावरच मनसेच्या या परीक्षाबाजीचं भवितव्य अवलंबून असेल

Tags: