www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या घाटकोपरमधील राजावाडी हॉस्पिटलविरोधात मनसेनं आंदोलन केलं होतं. मनसे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटलवर मोर्चा काढण्यात आला होता. हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोप मनसेनं केला.
रुग्णांसाठी तातडीनं सोयीसुविधा सुरू करण्यासोबतच कारभारातही सुधारणा करण्याची मागणी राम कदम यांनी केली आहे. हॉस्पिटल प्रशासनाशी केलेल्या चर्चेत सर्व मागण्या मान्य झाल्याचा दावा राम कदम यांनी केला आहे. त्यामुळे राम कदम यांनी राजावाडी हॉस्पिटलविरोधात मोर्चा काढला होता.
त्याचप्रमाणे रूग्णांची गैरसोय होत असल्याने त्याविरोधात फलक देखील लावण्यात आले होते. त्यामुळे आमदार यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण काही वेळातच हे फलक झाकण्यात आले होते.