www.24taas.com, मुंबई
पेट्रोलच्या दरवाढीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. महागाईचा आगडोंब उसळूनही जनता काँग्रेसला निवडून देतेच कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तीन वर्षांत सोळा वेळा पेट्रोलची दरवाढ झालीय. आता विरोधी पक्षांनी याविरोधात एकजूट दाखवण्याची गरज आहे. युपीए सरकारला तीन वर्ष झाल्याचा उत्सव पार पडला आणि दरवाढ करण्यात आली, अशी टीकाही शिवसेनाप्रमुखांनी केलीय.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. या दरवाढी विरोधात देशभरात वणवा पेटवू, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. ‘आता तरी देशातील जनतेने एकजुटीची वज्रमूठ आवळावी व काँग्रेसला हाणावी. विरोधी पक्ष म्हणून सगळ्यांनी अभेद्य एकजूट दाखवून देशभरात असंतोषाचा वणवा पेटवा’ असं आवाहनही त्यांनी केलंय.