www.24taas.com, मुंबई
शरद राव यांच्या रिक्षा युनियननं भाडेवाढीसाठी १६ एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. ई - मीटर सक्तीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा राव यांनी दिला आहे. इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीवर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळं आता आरटीओ इलेक्ट्रॉनीक मीटर बसवण्यासाठी मोहीम उघडणार आहे. मात्र रिक्षाचालकांचा या मीटरला विरोध आहे.
मुंबईत रिक्षांना मीटर लावणं बंधनकारक असल्याचं नुकतंच मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं.यासंदर्भात रिक्षाचालक संघटनेनं केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. रिक्षाचालकांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या नाहीत तर १६ एप्रिलपासून राज्यभरातल्या सगळ्या रिक्षाचालकांचा संप पुकारू असा इशारा शरद राव यांनी दिला आहे.
मुंबर्तल्या प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला होता. रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचं केलं जाणार आहे. सरकारनं ई-मीटर सक्तीचं केल्यानंतर त्याविरोधात रिक्षा संघटनांनी हायकोर्टात दाखल केली होती. मात्र प्रवाशांचा हित लक्षात घेऊन हायकोर्टानं संघटनांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे २ एप्रिलपासून रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर लावणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळेच शरद राव यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उगारलं आहे.