मुंबई : हिट अँड रन प्रकरणी सलमान खान पुन्हा अडचणीत आलाय. मुंबई हाय़कोर्टाच्या निर्णयाला राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय.
राज्य सरकारनं यासंदर्भात स्पेशल लिव्ह पिटीशन दाखल केली आहे. त्यामुळं सलमानच्या मागे पुन्हा कोर्टाचा फेरा सुरू झालाय.
हिट अँड रन प्रकरणी मुंबई हायकोर्टानं सलमान खानची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर राज्य सरकार या निर्णय़ाला आव्हान देणार का याबाबत चर्चा सुरू झाली होती.
अखेर राज्य सरकारनं सलमानविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. त्यामुळं सलमानच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.