मुंबई: मुंबईत रेल्वे अपघातांमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाहीये. गोरेगावमध्ये अशाच घटनेमुळे एका 27 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
वकिल खान असं या तरुणाचं नाव आहे. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्याआधी झालेल्या चढाओढीमध्ये वकिलला चक्कर आली, आणि त्यात तो रेल्वे ट्रॅकवर पडला, तितक्यात येणारी ट्रेन वकिलच्या अंगावर गेली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
ट्रेननं धडक दिल्यानंतर वकिलला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.
सीसीटीव्ही फूटेज बघून हा अपघात कसा झाला, याचा तपास करु आणि त्याची चौकशी करु अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रशासनानं दिली आहे.