www.24taas.com झी मीडिया, मुंबई
इंटरनेटच्या माध्यमातून ओळख वाढवून लोकांना गंडा घालणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्याकडून ३ लाख २६ हजारांचा चोरीचा माल पकडण्यात आलाय. या टोळीत दोन पुरूषांसह एका महिलेचा समावेश आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून गंडा घालणाऱ्या तिघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केलीय. सोहेल ऊर्फ सनी हसन शेख, साहिल हसन सय्यद आणि गौरी शेट्टी अशी तिघांची नावं आहेत. जैसवाल नावाच्या ठाण्यात राहणाऱ्या व्यक्तीशी गौरी शेट्टीने इंटरनेटच्या माध्यमातून मैत्री वाढवली. त्यानंतर गौरीने त्याच्याकडे पाच हजार रूपयांची मागणी केली. जैसवालने तिला आठ हजार रूपये दिले. त्यानंतर एकेदिवशी गौरी तिच्या दोन साथीदारांना घेऊन जैसवालच्या घरी आली. चाकूच्या सहाय्याने धाक दाखवून त्याच्या घरात दागिने आणि रोख रक्कम पळवली. जैसवाल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मालाडच्या 'ऑर्बिट' मॉलजवळ सापळा रचून तिघांना अटक केली आहे.
अशा घटनांपासून दूर राहण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून मैत्री करताना प्रत्येकाने सावध राहावं, असं आवाहन पोलिसांनी केलय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.