2006 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी 5 जणांना फाशी, तर 7 जणांना जन्मठेप

मुंबईतील 2006 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आज मोक्का कोर्टानं आपला निर्णय सुनावलाय. 12 दोषींपैकी 5 जणांना फाशीची शिक्षा तर 7 जणांना जन्मठेप सुनावण्यात आली.

Updated: Sep 30, 2015, 01:27 PM IST
2006 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी 5 जणांना फाशी, तर 7 जणांना जन्मठेप title=

मुंबई: मुंबईतील 2006 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आज मोक्का कोर्टानं आपला निर्णय सुनावलाय. 12 दोषींपैकी 5 जणांना फाशीची शिक्षा तर 7 जणांना जन्मठेप सुनावण्यात आली.

कमाल अन्सारी, एहतशाम सिद्दीकी, मोहम्मद शेख, नाविद हुसेन खान, आसिफ बशीर खान यांना फाशीची शिक्षा, तर तन्वीर अंसारी, मोहम्मद अन्सारी, मुजम्मील शेख, मोहम्मग शफी, शेख सोहेल, जमीर शेख, शेख मोहम्मद अली आलम शेख या 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

दरम्यान, मोक्का न्यायालयाच्या निर्णयाचा आदर आहे. मात्र उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं दोषींच्या वकीलांनी म्हटलंय. 

11 जुलै 2006ला संध्याकाळी सात ठिकाणी लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. यात 188 जणांचा मृत्यू झाला तर 829 लोक जखमी झाले होते. 

आणखी वाचा - ७/११ साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपींना ३० सप्टेंबरला सुनावणार शिक्षा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.