मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लावण्याची घोषणा करणारे भाजपचे खासदार किरीट सौमय्या यांची खिल्ली उडवणारे पोस्टर्स भाजप प्रदेश कार्यालया समोर लावण्यात आले होते. या पोस्टर्सवर सोमय्या यांच्या बोलण्याच्या लकबीची खिल्ली उडवणारी वाक्ये लिहण्यात आली होती.
या पोस्टरबद्दल आशिष शेलार यांनी टीका करताना म्हटलंय की या पोस्टरवर कोणीच आपलं नाव लिहलेलं नाही. चिल्लर लोक चिल्लरपणा करणार आम्ही त्याला तयार आहोत. शेलारांच्या या टीकेवर रविंद्र वायकरांनी पलटवार केलाय. पोस्टर कोणी लावली हे माहीत नाही. आशिष शेलारांनी कोणता चिल्लरपणा केला माहीत नाही. मात्र, शिवसेना कामाच्यामार्फत उत्तर देईल असंही त्यांनी म्हटलं आहे.