मुंबई : हजार, पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केल्यानंतर, दोन दिवसांनी आज सकाळी १० वाजता एटीएम उघडण्यात येणार आहेत. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता एटीएमसमोर रांगा लावू नयेत. घाई आणि गडबड करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
एटीएममधून प्रत्येकाला प्रत्येक दिवशी फक्त २ हजार रूपये काढता येणार आहेत. तसेच एका आठवड्यात एका व्यक्तीला फक्त २० हजार रूपये एटीएममधून काढता येणार आहेत. ३० डिसेंबरपर्यंत ही मर्यादा असेल, तसेच यासाठी कोणताही शुल्क बँकेकडून आकारला जाणार नाही.
घाबरून जाऊ नका, कारण नोटा अदलाबदली करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदत आहे. तर पैसे भरण्यासाठीही तेवढीच मुदत देण्यात आली आहे.