मुंबई : अॅन्टॉप हिल येथे एका मंगळसूत्र चोराला नागरिकांनी पकडलं, पण चोराने अख्ख मंगळसूत्र गिळून टाकलं. मग चोराला रूग्णालयात नेण्यात आलं, तेथे त्याच्या पोटाचा एक्स रे काढण्यात आला. तेव्हा चोराला मार न देता पोलिसांनी केळी खायला दिलीय, यामुळे नैसर्गिक पद्धतीने हे मंगळसूत्र पोलिसांना हस्तगत करता येणार आहे.
अॅन्टॉप हिलमधल्या गुरुतेग बहादूरनगरमध्ये सोनसाखळी चोरीचा अजब प्रकार उघड झालाय. प्रतीक्षा नगरमध्ये राहणाऱ्या राजश्री मयेकर रस्त्यानं चालत असताना, एका चोरानं त्यांचं मंगळसूत्र मारलं.
मंगळसूत्र ओरबाडल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला, आणि चोराला पकडलंही, पण त्याच्याकडे ते मंगळसूत्र मिळालं नाही. मात्र पोलिसांनी आणि एका नागरिकानं त्याला चोरी केल्यावर मंगळसूत्र गिळताना आणि पाणी पिताना पाहिलं होतं.
चोर कबुली देत नसल्यानं आणि नागरिक ठाम असल्यानं शेवटी त्याला चोराला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, त्याचा एक्सरे काढल्यावर त्यानं मंगळसूत्रं गिळल्याचं समोर आलंय. आता त्याला केळी खायला सांगण्यात आली आहेत, नाही तर त्याचं ऑपरेशन करुन मंगळसूत्र काढलं जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.