रेल्वे प्रवाशांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार

मुलुंडच्या पुढे प्रवास करणाऱ्या मध्ये रेल्वेच्या सर्व प्रवाशांच्या डोक्यावर पुन्हा एकदा मृत्यूची टांगती तलवार लटकतेय.

Updated: Apr 29, 2015, 07:04 PM IST
रेल्वे प्रवाशांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार title=

ठाणे : मुलुंडच्या पुढे प्रवास करणाऱ्या मध्ये रेल्वेच्या सर्व प्रवाशांच्या डोक्यावर पुन्हा एकदा मृत्यूची टांगती तलवार लटकतेय.

22 ऑक्टोबर 2009 रोजी ठाण्यातील कोपरी ब्रीजचा काही भाग लोकलवर कोसळून मोठा अपघात झाला होता. त्यात दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 15 जण गंभीर जखमी झाले होते. त्या भीषण अपघातानंतर तब्बल दोन दिवस रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. 

आज सहा वर्षांनी पुन्हा एकदा त्या ब्रीजची दुरावस्था झालीय. ब्रीजवरील दोन्ही बाजुच्या फुटपाथचा भाग कमकुवत होऊन भेगा पडल्यायत...  ब्रिजवरून माती देखील खाली कोसळतेय. त्यामुळं पुन्हा एकदा हा ब्रीज कोसळणार की काय, या भीतीनं रेल्वे प्रवासी धास्तावलेत... 

रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं या दुरावस्थकेडं गांभीर्यानं लक्ष देऊन, तात्काळ दुरूस्तीची पावलं उचलावीत, अशी मागणी ठाणेकरांनी केलीय.

पाहा व्हिडिओ 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.