अभिनेत्री रती अग्निहोत्रीने पतीविरोधात तक्रार

बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री रती अग्निहोत्रीने आपले पती अनिल वीरवानी यांच्या विरुद्ध वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

Updated: Apr 29, 2015, 05:55 PM IST
अभिनेत्री रती अग्निहोत्रीने पतीविरोधात तक्रार title=

मुंबई : बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री रती अग्निहोत्रीने आपले पती अनिल वीरवानी यांच्या विरुद्ध वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

पतीने रविवारी रात्री त्यांना चाकूचा धाक दाखविल्याची तक्रार रती यांनी दाखल केली आहे. त्यांनी वरळी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिली त्यानंतर पोलीस त्यांच्या घरी गेले होते. 

वरळी पोलिसांनी धमकी दिल्याप्रकरणी वीरवानी यांच्या विरोधात आयपीसीच्या कलम ५०६ नुसार प्रकरण दाखल केले आहे. गेल्या महिन्यात रती यांनी घरगुती हिंसा कायद्यातंर्गत तक्रार दाखल केली आहे. 

अभिनेत्रीच्या तक्रारीवरून अजून अनिल वीरवानी यांनी अटक केली नाही. पोलिसांनी सांगितले की चौकशीनंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

दोघांचे लग्न १९८५ मध्ये झाले होते. वीरवानी पेशाने व्यावसायिक आणि आर्किटेक्ट आहेत. रती अग्निहोत्री यांनी कुली आणि एक दुजे के लिए (१९८१), दो दिल दिवान (१९८१) या सुपरहीट चित्रपटात काम केले होते. 

रति अग्निहोत्री गेल्या वर्षी 'द शौकिन्स' चित्रपटात दिसून आली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.