मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हालचाली वाढल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काही बड्या नेत्यांनी राज्यातील परिस्थितीची पुन्हा एकदा चाचपणी करण्यास सुरूवात केलीय.
बड्या प्रकल्पांना ब्रेक, जनतेत चर्चा
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते लवकरच दुष्काळी दौऱ्यांच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या काळातील अनेक प्रकल्पांना सध्याच्या सरकारकडून ब्रेक लावला जात असल्याने राष्ट्रवादी जास्त अस्वस्थ असल्याचंही एक कारण आहे. नाशिक विभागातील सर्वात मोठा प्रकल्प, जळगाव जिल्ह्यातील पाडळसरे धरणाचं कामंही बंद पडलं आहे, असे बडे प्रकल्प बंद पडत असल्याने जनतेते अस्वस्थता वाढत आहे.
राज्यात भाजप सरकारची कसरत वाढणार
शिवसेनेच्या पाठिंब्यावर असलेले देवेंद्र फडणवीस सरकार हे आवाजी बहुमताने सत्तेत आहे. शिवसेनेची नाराजी असली तरी राष्ट्रवादीने आतापर्यंत भाजपला टेकू देऊ असंच म्हटलंय. यामुळे आता भाजपला राज्यात आणखी अडचणीतून सरकार चालवावं लागणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत समीकरणं बदलाची शक्यता
राज्यात भाजपवर शिवसेनेची अंतर्गत नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे, पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक असल्याने आणखी समीकरणं बदलण्याची शक्यता वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेचा पाठिंबा अचानक, ऐन वेळेस काढून घेतला होता, तो बदला घेण्याची संधीही मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला आहे, मात्र शिवसेनेची यावर कोणतीही भूमिका ठरली नसल्याचं स्पष्ट आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.