मुंबई : भाजप अल्पमतातलं सरकार स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
शिवसेनेसोबत युती करण्यास राज्यातल्या भाजपच्या काही नेत्यांचा तीव्र विरोध आहेत. त्यामुळं अल्पमतातलं का होईना पण स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा आग्रह या नेत्यांनी लावून धरलाय. भाजपनं काही अपक्ष आमदारांसोबत चर्चा सुरू केली असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.
केंद्राप्रमाणे राज्यातही नॅनो मंत्रिमंडळाचं धोरण अवलंबण्यात येणार आहे. तर दुसरीकडे २९ किंवा ३० ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भाजपचे पक्षनिरीक्षक राजनाथ सिंह हे सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईत येण्याची शक्यता आहे. भाजप नेते विनोद तावडेंच्या सरकारी निवासस्थानी भाजपची बैठक झाली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह व्ही सतीश आणि विनोद तावडेही उपस्थित होते.
दरम्यान, रासपला मंत्रिपद देण्याबाबतही निर्णय घेण्यात आल्याची माहिती रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.