मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तथाकथित ‘ब्लू प्रिंट’ २५ सप्टेंबरला प्रकाशित होणार आहे.
मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी स्वतः ही माहिती दिलीय. 25 सप्टेंबर रोजी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी ब्लू प्रिंट प्रकाशित होणार आहे.
ही ब्लू प्रिंट म्हणजे फक्त डॉक्युमेंट नाही तर महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा असणार आहे, असा दावा यावेळी राज ठाकरे यांनी केलाय.
महत्त्वाचं म्हणजे या ब्लू प्रिंटच्या प्रकाशनाला टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यापैकी कुणीही उपस्थित राहणार नाही, असा खुलासाही राज ठाकरेंनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.