मुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी छगन भुजबळांच्या दोन दिवसांची ईडी कोठडी देण्यात आलीय. भुजबळ तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा ईडीनं कोर्टात केला.
भुजबळांच्या उत्पनाच्या स्त्रोतांबाबत खूप संशय आहेत. त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा दावाही ईडीनं केला. कॉन्ट्रॅक्टर आणि सबकॉन्ट्रॅक्टर यांच्याशी भुजबळांशी असलेले संबंध आणि त्यांच्यात झालेल्या व्यवहारांबाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. यामुळे त्यांची अधिक चौकशी करण्याची गरज असल्याचं ईडीनं सांगितलं. त्यामुळं भुजबळांना तीन दिवसांच्या कोठडीची मागणी ईडीनं कोर्टात केली होती.
भुजबळांच्या सर्व कंपन्यांचे संचालक खोटे असून नामधारी संचालकांमार्फत व्यवहार करण्यात आले आहेत. त्यामुळं सर्व व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीनं कोर्टात सांगितलंय.तर भुजबळांना हृदयासंबंधी आजार असल्याचा दावा भुजबळांच्या वकिलांनी केला. तसंच आपल्याविरोधात राजकीय षडयंत्र असल्याचा दावा भुजबळांनी कोर्टात केलाय.