ठाकरे - मोदींच्या संवादानं मुख्यमंत्रीही अवाक्

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गेल्या रविवारी दूरध्वनी संवाद साधलाय. 'नीट'च्या विषयावर आपले मोदींशी बोलणं झाल्याची माहिती बैठकीत ठाकरेनी दिल्यावर मुख्यमंत्रीही अवाक् झाल्याचं समजतंय. 

Updated: May 18, 2016, 11:47 AM IST
ठाकरे - मोदींच्या संवादानं मुख्यमंत्रीही अवाक् title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गेल्या रविवारी दूरध्वनी संवाद साधलाय. 'नीट'च्या विषयावर आपले मोदींशी बोलणं झाल्याची माहिती बैठकीत ठाकरेनी दिल्यावर मुख्यमंत्रीही अवाक् झाल्याचं समजतंय. 

केवळ पाच मिनिटं झालेल्या या संवादाने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठया घडामोडींचे तर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

मध्यस्थ कोण?

मुळात राज ठाकरे - नरेंद्र मोदी यांच्या संवादात मध्यस्थ कोण? याबद्दलही कुतूहल आहे. कारण या संवादाची खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही कल्पना नव्हती असं सांगितलं जातंय. 

पुढच्या महिन्यात मोदी-ठाकरे भेट होणार? 

चार वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचा योग पुन्हा जुळून येणार असल्याची माहिती मिळतेय. स्वतः मोदी यांनी राज ठाकरे यांना दिल्ली भेटीचं निमंत्रण दिलंय. गेल्या रविवारी नीट परिक्षेसंदर्भात राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींशी फोनवर संवाद साधला होता. त्यावेळी मोदी यांनी हे निमंत्रण दिल्याची माहिती मिळतेय.