मुंबई : मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना आज एक सुखद अनुभव मिळाला. सीएसटी ते ठाणे असा प्रवास करत असतांना रत्नप्रभा शिंदे यांना प्रसुती वेदना व्हायला लागल्या, आणि त्यांनी भांडुप रेल्वे फलाटावर एका मुलीला जन्म दिला.
तब्बल वीस मिनिट सर्व महिला प्रवासी जीव मुठीत घेऊन त्या महिलेची प्रसुती करण्यासाठी पराकाष्ट करत होते. अखेर रात्नप्रभा यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला, आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला .
ठाण्याला राहणारी रत्नप्रभा शिंदे या सीएसटी वरून नेहमीप्रमाणे लोकल ट्रेनने ठाण्याला येण्यासाठी निघाल्या होत्या. ट्रेन घाटकोपर स्थानकात आली असता तिला प्रसुती वेदना होऊ लागल्या . भांडूप येईपर्यंत तिची प्रकृती हि चिंताजनक झाली.
शेवटी ट्रेनमधील महिलांनी ट्रेनची चेन खेचून भांडूप रेल्वे स्थानकावर गाडी थांबवली. त्यावेळी पुढील महिला डब्ब्यात कर्तव्यावर असलेल्या महिला होमगार्ड सीमा पिसाळ यांनी परिस्थितीच गांभीर्य पाहून रेल्वे फलाटावर तिची प्रसुती करायचा निर्णय घेतला.
सीमा पिसाळ यांच्या समय सूचकतेमुळे रत्न प्रभाची सुखरूप प्रसुती झाली, आणि तिला सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात दाखल करण्यात आलं. रात्नप्रभाला जर वेळीच मदत मिळाली नसती, तर कदाचित बाळ दगावलं ही असतं.
सध्या या बाळाची आणि तिच्या आईची प्रकृती स्थिर असून या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. सीमा पिसाळ यांच्या समय सूचकतेमुळे आज रत्नप्रभा आणि त्यांच्या बाळाला सुखरूप वाचवता आलं, त्यामुळे पिसाळ यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सीएनजीवर चालणारी ट्रेन सर्व डबे तसेच इंजीन हे सामान्य असेल. या ट्रेनमधील सीएनजी सिलेंडर हे ट्रेनच्या शेवटच्या भागात असतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.