मुंबई : वांद्रे येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्यात. यावर युवा सेनेनं जोरदार आक्षेप नोंदवलाय.
हे सातही विद्यार्थी युवा सेनेचे सदस्य आहेत. 15 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या युवा सेनेच्या मोर्चात ते सहभागी झाले होते. यामुळे, कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेला शिक्षणमंत्र्यांचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता.
याचाच राग मनात धरून शिक्षणमंत्री सूडबुद्धीनं ही कारवाई केली गेलीय, असा आरोप 'युवा सेने'नं केलाय. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही याबद्दल ट्विटरवर नाराजी व्यक्त केलीय.
Hearing it for the first time but letter states that FIRs have been lodged on students for being with Student wings and voicing opinions
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 31, 2016
ही कारवाई मागे घेतली नाही तर युवा सेनेच्या स्टाइलनं पाठपुरावा करू, असा इशाराही युवा सेनेनं दिलाय.