अखेर राष्ट्रवादीसमोर काँग्रेसची सपशेल माघार

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या मोहन जोशींनी आपला अर्ज मागे घेतला आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या दबावाच्या राजकारणापुढे काँग्रेसने सपशेल शरणागती पत्कारल्याचं म्हटलं जात आहे. विधान परिषदेची एका जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू होती.

Updated: Aug 14, 2014, 12:53 PM IST
अखेर राष्ट्रवादीसमोर काँग्रेसची सपशेल माघार title=

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या मोहन जोशींनी आपला अर्ज मागे घेतला आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या दबावाच्या राजकारणापुढे काँग्रेसने सपशेल शरणागती पत्कारल्याचं म्हटलं जात आहे. विधान परिषदेची एका जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू होती.

मोहन जोशी यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. विनायक राऊत हे लोकसभा निवडणूक खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. मात्र या जागेवर शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. म्हणून एकही उमेदवार या निवडणुकीत उतरवला नाही.

मात्र काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी देऊन या जागेवर मागे न हटण्याचं सुतोवाचं केलं होतं. मात्र आज मोहन जोशी यांनी आपला अर्ज मागे घेतला, यावरून राष्ट्रवादीच्या दबावापुढे काँग्रेसने सपशेल माघार घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.