मुंबई : मोबाईलवर इंटरनेटचा वापर वाढत असल्याने सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणातही वाढ होत आहे. या वाढत्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरिता मुंबईत कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी) केंद्र आणि सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे, हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.
सायबर गुन्ह्यांवर मात करण्याकरिता पहिल्या टप्प्यात पोलीस दलातील १ हजार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या गुन्ह्यांच्या तपासाकरिता उपायुक्त दर्जाचा स्वतंत्र अधिकारी असेल, तसेच स्वतंत्र सायबर क्राईम विंग स्थापन करण्यात येणार आहे.
सीईआरटी केंद्र मुंबईत सुरु झाल्यावर सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध घालता येईल. नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या महानगरांतही त्याच धर्तीवर यंत्रणा उभी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.