मुंबई : मुख्यमंत्री आणि डान्स बार मालकांचं डील झालंय. त्यामुळंच डान्स बार बंदीबाबत सरकार गंभीर नाही, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय.
मुख्यमंत्री, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि डान्स बार मालकांची बैठक झाली. त्यात हे डील झालं. त्यामुळंच सुप्रीम कोर्टात सरकारनं नीट पाठपुरावा केला नाही.
डान्स बार बंद करण्याची सरकारची इच्छा नाही, असा भडीमार मलिक यांनी केलाय. तर मलिक हे धादांत खोटं बोलत असून त्यांचं मानसिक संतूलन बिघडल्याची खरमरीत टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.