मुंबई : युतीबाबत भाजप निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या कोर्टात असल्याचे सांगून त्यांनाच निर्णय घ्याचाय असे स्पष्ट केले. त्यानंतर उद्धव यांनी निर्णयाचा चेंडू भाजपकडे भिरकावून लावला. आपल्याला निरोप नाही. 'मातोश्री'वर कोणतेही बैठक होणार नसल्याचे स्पष्ट करत सेनेने योग्य निर्णय दिलाय. त्यावर त्यांनाच निर्णय घ्यायचा आहे, उद्धव म्हणालेत.
आदित्य ठाकरे - दोन्ही पक्षांचा मनोदय आहे की, महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करायचा, बाळासाहेबांनी आणि प्रमोद महाजन यांनी बनवलेली युती कायम असावी. आमच्याकडे कुणालाही अहंकार नाही. महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय शिवसेना घेईल.
सुभाष देसाई - शिवसेना आणि भाजप युती कायम राहणार आहे. मात्र, जागावाटपासंदर्भातला अंतिम निर्णय उद्धव ठाकरे आणि ओम माथूर घेतील. या बैठकीत भाजप नेत्यांशी सकारात्मक स्वरुपाची चर्चा झाली. युतीच्या जागावाटपाबाबत रात्री आणखी चर्चा होईल.
महायुती कायम ठेवणार असा निर्णय भाजपचे ज्येष्ठ नेते ओम माथूर आणि आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी घेतल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतरची बोलणी उद्धव ठाकरे यांच्याशी होतील असे सांगण्यात आले. मात्र, उद्धव यांनी आपण पाय मोकळे करण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये आल्याचे सांगून भाजपच्या प्रस्तावाची हवाच काढली. त्यामुळे युतीबाबत अजुनही संभ्रम कायम आहे. त्यामुळे तिढा सुटण्याऐवजी कायम असल्याचे दिसत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.