मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण असा प्रवास लोकलने केला. कुलाब्यातील कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांना कल्याणला जायचे होते, कल्याणला रस्त्याने वेळेवर पोहोचणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी लोकलचा पर्याय वापरला.
मुख्यमंत्र्यांनी ऐन गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास केला, तसेच प्रवाशांशी देखिल संवाद साधला. यावेळी अनेक प्रवाशांनी मुख्यमंत्र्यांना गर्दी कमी करण्याच्या सूचना देखिल केल्या. काही प्रवाशांनी मोबाईल फोन खिशातून काढला आणि आपल्या नातेवाईकांशी बोलण्याची विनंती केली, ही विनंतीही मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.