'सिडको' २९ नोव्हेंबरला करणार इच्छुकांची 'स्वप्नपूर्ती'

तुमची ‘सिडको’ची ‘स्वप्नपूर्ती’ योजनीची सोडत २९ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही लॉटर लांबणीवर पडली होती. 

Updated: Nov 22, 2014, 09:52 PM IST
'सिडको' २९ नोव्हेंबरला करणार इच्छुकांची 'स्वप्नपूर्ती'  title=

नवी मुंबई : तुमची ‘सिडको’ची ‘स्वप्नपूर्ती’ योजनीची सोडत २९ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही लॉटर लांबणीवर पडली होती. 

ही लॉटरी जाहीर होण्याआधी ७ व मजला, सिडको भवन इथं ‘सिडको’ची एक बैठक २५ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या बैठकीत लॉटरीच्या प्रक्रियेबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे.  

`सिडको’ वतीने खारघर, सेक्टर ३६ येथे उभारण्यात येणाऱ्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील ३,१५४ घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जवळपास ८५ हजार नागरिक आपले नशीब अजमाविणार आहेत. दरम्यान, स्वप्नपूर्ती गृह प्रकल्पासाठी २० सप्टेंबर या अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ८५,१०७ नागरिकांनी अर्ज भरले आहेत. यापैकी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटासाठी ४७,०९० तर अल्प उत्पन्न गटासाठी ३८,०१७ अर्जाचा समावेश आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.