मुंबई : सरकारने दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर केली खरी मात्र, यातही मोठा घोळ केल्याचं समोर आलंय. राज्य सरकारनं दुष्काळग्रस्तांना मदतीचा जीआरच काढला. मात्र यातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांव्यतिरिक्त मदत करण्यात यावी, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय.
त्यामुळं कापूस उत्पादक शेतक-यांना आता तरी मदत मिळणार नसल्याचं समोर आलंय. सर्वात महत्त्वाचं म्हणझे दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी सरकार मदत करत असलं तरी दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मराठवाड्यात कापूस हेच मुख्य पीक आहे. तरीही कापूस उत्पदकांना का डावलण्यात आलं हा सवाल उपस्थित झालाय.
यामागं नेमकं सरकारचं काय धोरण आहे हेदेखील समजायला मार्ग नाही. त्यामुळं दुष्काळग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळं राष्ट्रवादीचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी कापूस उत्पादक शेतक-यांना तातडीनं मदतीची मागणी केलीय.