मुंबई : आता कोणत्याही बँकेच्या ATMमधून आपल्या कोणत्याही बँकेच्या खात्यात पैसे जमा करणं लवकरच शक्य होणार आहे.
नॅशनल फायनान्शियल स्वीच यंत्रणेद्वारे देशातले सर्व ATM जोडले आहेत. याच प्रणालाची वापर या नव्या सुविधेसाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननं रिझर्व्ह बँकेला प्रस्ताव दिलाय.
RBIनं या प्रस्तावाबाबत अनुकुलता दर्शवली आहे... याला मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे संकेत RBIचे डेप्युटी गव्हर्नर एच.आर. खान यांनी दिलेत. यावर शुल्क आकारण्याबाबत बँकांशी चर्चा करून निर्णय़ घेण्यात आल्याचं खान यांनी स्पष्ट केलंय.
सध्या कोणत्याही बँकेच्या एटीएम मशीनमधून आपल्याला पैसे काढण्याची मुभा आहे, त्याच धर्तीवर यापुढे आपल्याला कोणत्याही बँकेच्या एटीएममधून (जिथे कॅश डिपॉझिटची व्यवस्था आहे) पैसेही भरता येऊ शकतील, असे तंत्रज्ञान विकसित करण्यावर सध्या काम सुरू असून, चालू आर्थिक वर्षात ही सुविधा प्रत्यक्षात येऊ शकेल.
भारतीय रिझर्व्ह बँकेने या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. या स्वीचच्या माध्यमातून देशातील सर्व बँकांची एटीएम ही एकमेकांशी जोडली गेली आहेत. या स्वीचमुळेच आपल्याला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आपल्या खात्यातील पैसे काढणे शक्य होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.