मुंबई : एसआरए प्रोजेक्टमध्ये नागरिकांची बिल्डरकडून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी सरकार कडक धोरण अवलंबणार आहे , असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
लोकांकडून जागा घेतात आणि दहा-दहा वर्ष कामं करत नाहीत. तसेच लोकांना बाहेर काढून त्यांचं भाडही देत नाही अशी परिस्थिती सध्या आहे. मात्र आता ठरलेल्या वेळेत काम न झाल्यास सरकार हा प्रोजेक्ट आपल्याकडे घेऊन शिवशाही किंवा टेंडर पध्दतीने पूर्ण करेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.