मुंबई : विलेपार्ले येथिल साठ्ये कॉलेजमध्ये गेल्या महिन्याभरापासून विद्यार्थींनींना शौचालय वापरता येत नाहीय. कॉलेजचे सफाई कामगारांनी अचानक शौचालय साफ करण्यास मनाई केल्याने गेल्या 30 दिवसांपासून शौचलये साफ करण्यात आलेली नाहीत.
परिणामी दुर्गंधी, कचरा, घाण शौचालयात साठल्याने विद्यार्थीनी कॉलेजच्या शौचालयात जात नसल्याचं सांगतात. 11 वी ते 15 वी पर्यंत साठ्ये कॉलेजमध्ये विद्यार्थी शिकतात. सहा तास कॉलेज असतं. कॉलेजच्या जवळपास कुठेही सार्वजनीक शौचालय नाही अशा परिस्थितीत विद्यार्थीनींनी काय करायचे? अडचणींच्या दिवशी तर दांडी मारावी लागते नाहीतर त्रास सहन करण्यापलीकडे मुलींना पर्याय नाही.
याप्रकरणी आम्ही कॉलेजमध्ये जाऊन प्राचार्य कविता रेगे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण इथल्या सुरक्षा रक्षकांनी आम्हला आत तर सोडाच पण साधं गेट बाहेरही उभं राहू दिलं नाही. आम्ही तुमची तक्रार करु असं म्हटल्यावर माझं नाव मुंडे आहे ज्याला सांगायचे त्याला सांगा या भाषेत आम्हाला कॉलेजगेट वरुन बाहेर ढकलण्यात आलं.
प्राचार्य कविता रेगे यांनी फोनवरच आम्हाला प्रतिक्रीया दिली, सफाई करणारा कामगार सरकारी कर्मचारी असून त्यांनी काम करणं बंद केलंय. आम्ही मुलींनाच त्यांच्याशी बोलण्यास सांगत असून जर दररोज आम्ही बाहेरच्या लोकांकडून साफ करवून घेतले तर यांना पगार का द्यायचा ...
पण मग एक महिना उलटला तरी कॉलेज प्रशासनाला यावर उपाय का करता आला नाही? सरकार कडे याची तक्रार करण्यात आली नाही ? विशेष म्हणजे साठ्ये कॉलेजला यंदा मुंबई विद्यापीठाने बेस्ट कॉलेजच्या पुरस्काराने नावाजले आहे.
पण बेस्ट कॉलेजमध्ये जर विद्यार्थ्यांना साधं स्वच्छ शौचालयही उपलब्ध होत नसेल तर काय फायदा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.