www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दिवाळीच्या तोंडावर सरकारनं सामान्य नागरिकांसाठी खरोखरच गुड न्यूज दिली आहे. रेशनिंगवर साखर उपलब्ध करून देण्यासाठी खुल्या बाजारातून साखर खरेदी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, स्वस्त कांदा देण्याचा निर्णय घेतलाय.
ही साखर प्रति किलो १३ रूपये ५० पैसे या दराने प्रति माणशी ५०० ग्रॅम व सणासुदीच्या काळात प्रति माणशी ६६० ग्रॅम साखर रेशनिंगवर देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार ग्राहकांना ४० ते ५० रुपये दराने कांदा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती राज्याचे कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीय.
व्यापारी साठेबाजी करत असतील तर कारवाई करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. परतीच्या पावसामुळं कांद्याचे मोठे नुकसान झालंय. या नैसर्गिक संकटामुळंच कांद्याची भाववाढ झाल्याचं विखे पाटलांनी सांगितलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.