'त्याच्या पाठीत...', सैफचा घरी जातानाचा Video शेअर करत शिंदेंच्या नेत्याने व्यक्त केली वेगळीच शंका

Saif Ali Khan DMC Eknath Shinde Party Leader Questions: सैफ अली खानवर पाच दिवस उपचार करण्यात आल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 22, 2025, 02:52 PM IST
'त्याच्या पाठीत...', सैफचा घरी जातानाचा Video शेअर करत शिंदेंच्या नेत्याने व्यक्त केली वेगळीच शंका title=
शिंदेंच्या नेत्याचा प्रश्न (फाइल फोटो)

Saif Ali Khan DMC Eknath Shinde Party Leader Questions: अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी त्यांच्या वांद्रे येथील घरात प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यातील आरोपीला अटक करुन तपास सुरु असतानाच मंगळवारी, 21 जानेवारी रोजी सैफला लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सैफवर पाच दिवस उपचार करण्यात आले. यादरम्यान त्याच्यावर दोन शस्रक्रीया करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान सैफ सोमवारी रुग्णालयातून बाहेर पडून घरी आल्यानंतर अगदी सामान्यपणे चालतच तो घरी पोहोचला. प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांनी टीपलेले सैफचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. असं असतानाच सैफ अवघ्या पाच दिवसांमध्ये एवढा तंदुरुस्त कसा झाला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. विशेष म्हणजे हा प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षातील एका नेत्याचाही समावेश आहे. सैफचा घरी चालत जातानाचा व्हिडीओ शेअर करत या नेत्याने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

दोन शस्रक्रीया

सैफ अली खानवर 16 तारखेच्या रात्री केलेल्या हल्ल्यामध्ये चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या मूळच्या बांगलादेशी चोराने सहा वार केले. हे वार सैफच्या डाव्या हातावर, मानेवर आणि पाठीत करण्यात आले. घरात शिरलेल्या चोराला सैफने घट्ट पकडून ठेवल्याने त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी चोराने सैफच्या पाठीत सुरा खुपसला. सैफच्या पाठीच्या कण्यापासून काही इंचावर झालेल्या या हल्ल्यामुळे सैफ रक्तबंबाळ झाला आणि त्याची पकड ढिली पडल्याने चोराला पळ काढता आला.

पाठीत चाकूचा तुकडा अडकलेल्या अवस्थेत सैफ त्या रात्री रिक्षाने तैमूर आणि इब्राहिमच्या मदतीने लिलावती रुग्णालयात पोहोचला. तिथे त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले.

नक्की पाहा हे फोटो >> 'त्या रात्रीचं भाडं तर देणारच शिवाय...'; जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालकाला भेटून सैफने दिलं वचन

व्हाइट शर्ट आणि जिन्समध्ये चालतच घरी पोहोचला सैफ

16 तारखेपासून सैफवरील हल्ला आणि त्यासंदर्भातील बातम्या समोर येत असतानाच 19 तारखेला आरोपीला पकडण्यात यश आल्यानंतर या हल्ल्यामागील मूळ उद्देश, घटनाक्रम आणि इतर गोष्टींची चर्चा सुरु असून पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास केला जात आहे. अशातच मंगळवारी सैफला डिस्चार्ज दिल्यानंतर तो व्हाइट शर्ट आणि जिन्स अशा लूकमध्ये चालतच स्वत:चं घर असलेल्या इमारतीच्या गेटमधून आत जातानाचं दुष्य प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांनी टीपलं. सैफ व्हिलचेअरवर वगैरे येईल असं अनेकांना वाटत होतं. मात्र सैफ चालत चालत गेल्याचं पाहून अनेकानी आश्चर्य व्यक्त केलं. 

नक्की वाचा >> करिनाच्या 'त्या' चुकीमुळे आरोपीला पळून जाण्यात यश आलं! पोलिसांचा दावा; म्हणाले, 'हल्ल्यानंतर तिने फोन...'

शिंदेंच्या नेत्याने उपस्थित केले प्रश्न

सैफला असं कॅज्युअली चालत जाताना पाहून एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नेते संजय निरुपम यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. सैफचा चालत इमारतीत प्रवेश करतानाचा व्हिडीओ आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत संजय निरुपम यांनी, "डॉक्टरांचं म्हणणं होतं की सैफ अली खानच्या पाठीत 2.5 इंच आतपर्यंत चाकू घुसला होता. कदाचित चाकूचा तुकडा पाठीतच अडकला होता. सलग सहा तास रुग्णालयामध्ये शस्रक्रीया पार पडली. ही गोष्ट 16 जानेवारीची आहे. आज 21 जानेवारी आहे. रुग्णालयातून निघाल्यानंतर (सैफ अली खान) एवढा फीट कसा? ते सुद्धा केवळ 5 दिवसांमध्ये? कमाल आहे," अशी पोस्ट केली आहे.

नक्की वाचा >> सैफवर हल्ला झाला तेव्हा बिल्डींगचे सिक्युरीटी गार्ड काय करत होते? मोठा खुलासा; पोलीस म्हणाले, 'आरोपीने स्वतःचे..'

वडेट्टीवार यांचा निरुपम यांना टोला

दरम्यान, विधानपरिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते आणि विद्यमान काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी संजय निरुपम यांनी केलेल्या पोस्टवर प्रसारमाध्यमांशी बोलताना मत व्यक्त केलं. "संजय निरुपम हे सैफच्या जास्त जवळचे असावेत म्हणून त्यांना अधिकची माहिती असावी. जखम अडीच इंच होती की तीन इंचची होती. सैफ अली खान चालायला लागला स्वस्थ झालं याचा दुःख निरूपम यांना झालं असावं," असा खोचक टोला वडेट्टीवार यांनी लगावला.