Akshay Kumar Hera Pheri : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर काही चांगली कामगिरी करत नाहीये. त्याचे चित्रपट हे आधी चांगलेच चर्चेत राहायचे. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अभिनेत्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत नसल्याचे दिसून येत आहे. तर 'भूल भुलैया' ची फ्रॅंचायझीमध्ये देखील तो दिसला नाही. ज्यात त्याला पाहण्यासाठी सगळेच प्रेक्षक उत्सुक होते. त्याची जागा अभिनेता कार्तिक आर्यननं घेतली. खरंतर, त्यानं याचं कारण सांगितलं आहे की तो चित्रपटात का दिसला नाही. त्यासोबत 'हेरा फेरी 3' ला घेऊन त्यानं एक मोठी अपडेट शेअर केली आहे.
अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट स्काय फोर्सच्या प्रमोशन दरम्यान, बोलताना 'भूल भुलैया' ची फ्रॅंचायझीविषयी बोलला. अक्षयच्या या आगामी चित्रपटांना पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असले तरी देखील त्यांना अक्षयला कॉमेडी करताना पाहायचं आहे. यावेळी चाहत्यांना अक्षय कुमारला विविध प्रश्न विचारले. एका चाहत्यानं अक्षय कुमारला सांगितलं की तो 'भूल भुलैया 2' आणि 'भूल भुलैया 3' मध्ये नसल्यानं त्यानं हे दोन्ही चित्रपट पाहिले नाही. तर चाहत्यानं केलेल्या या वक्तव्यावर उत्तर देत सांगितलं की 'बेटा, मला त्यातून काढून टाकण्यात आलं.'
हेही वाचा : झीनत अमान थोडक्यात बचावल्या! गळ्यात अडकलेल्या गोळीमुळे श्वास घेता येई ना अन्...; स्वत: सांगितला घटनाक्रम
त्यानंतर अक्षय कुमार 'हेरा फेरी 3' विषयी अपडेट देत म्हणाला, 'मी हेरा फेरी 3 ची शूट सुरु करण्यासाठी उत्सुक आहे. मला माहित नाही, पण जर सगळं काही ठीक असलं तर यावर्षी चित्रपटाचं शूट हे सुरु होईल. जेव्हा आम्ही हेरा फेरी सुरु केली तेव्हा आम्हाला माहित नव्हतं की हा इतका कल्ट सिनेमा होईल. पण जेव्हा मी चित्रपट पाहिला तेव्हा माझ्या हे लक्षातच आलं नाही की हो हा चित्रपट इतका मजेशीर आहे. पण आमच्यापैकी कोणत्याही व्यक्तीला ही अपेक्षा नव्हती की बाबू भैया, राजू आणि श्यामच्या भूमिका या कल्ट होतील.' दरम्यान, आता 'हेरा फेरी 3' कधी पाहायला मिळणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत.