मुंबई : आरोग्य, वैभव, आनंद घेऊन आली दिवाळी. नरकचतुर्दशीला पार पडलं पहिलं अभ्यंगस्नान. फटाके फोडत आनंदोत्सव आज साजरा कऱण्यात येत आहे.
दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्यात. भेटवस्तू आणि रेडीमेड फराळासाठी गर्दी बाजारपेठेत दिसून येत आहे. मिठाई, चॉकलेट आणि ड्रायफ्रुटलाही मागणी वाढलेली दिसून येत आहे. तर फराळाच्या रेसिपीसाठी तरुणांनी मोबाईल अॅप तयार केलेय.
इंटरनेटच्या युगात ऑनलाईन शॉपिंगला पसंती मिळतेय. आता दिवाळीचा पारंपरिक फराळ सुद्धा अॅपवर उपलब्ध आहे. काही तरुणांनी फराळाच्या रेसिपीसाठी मोबाईल अॅप्लिकेशन तयार केलंय. दिवाळी म्हणजे एकमेकांना भेटून शुभेच्छा देत भेटवस्तू देण्याचा सण. सध्या बाजारात भेटवस्तूंसाठी विविध पर्याय आहेत. त्यात या अॅपची भर पडलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.