मुंबई : राज्यात बहुतांश ठिकाणी ५५ टक्के कमी पाऊस झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी १५०० रूपयांची मदत राज्य सरकार करेल, ही मदत २ हेक्टरपर्यंत असेल.
तसेच चारा पिकासाठी २५ कोटी रूपयांची मदत उभारली जाईल, ही चारा डेपोसाठी वापरण्यात येईल. दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध असल्याची माहिती देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.
मी पश्चिम महाराष्ट्राचा विरोधक नाही, पण पश्चिम महाराष्ट्रात २००८ आणि २००९ साली झालेल्या कर्जमाफीचा सर्वात जास्त फायदा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.