www.24taas.com, झी मिडिया, मुंबई
तुम्हाला पासपोर्ट काढायचं आहे आणि त्यासाठी पासपोर्ट ऑफिसचे खेटे घालावे लागतायेत... पण काम होतंच नसेल तर... म्हणूनच पासपोर्ट देण्याची सुविधा सुरळीत करण्यासाठी मुंबईतल्या अंधेरी आणि मालाड इथल्या पासपोर्ट कार्यालयात यापुढं ऑनलाईन भेट घेणं म्हणजेच अपॉईंटमेंट घेणं बंधनकारक आहे.
पासपोर्ट अर्ज ऑनलाईन भेटीच्या स्वरूपात हाताळण्यासाठी वॉक इन हा पर्याय येत्या २० डिसेंबरपासून बंद होणार आहे, असं प्रादेशिक पासपोर्ट अधिकार्यां नी स्पष्ट केलंय.
मुंबईच्या पासपोर्ट कार्यालयाच्या कक्षेत येणार्याअ संभाजीनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दमण आणि दादरा नगर हवेली या भागांत राहणार्या् अर्जदारांना सध्या अर्जक्रमांकासह ‘वॉक इन’ असा पर्याय उपलब्ध आहे. मात्र २० डिसेंबरपासून ही प्रक्रिया बंद केली जाणार आहे.
ऑनलाईन देयक पद्धतीची माहिती व्यवस्थित भरल्यानंतर भेटीच्या उपलब्धतेची समस्या राहणार नाही आणि भेटीच्या वेळाही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील. तसंच वॉक इन पर्याय बंद करून सर्व पासपोर्ट अर्ज ऑनलाईन भेटीच्या स्वरूपात हाताळल्यामुळं मुंबई पासपोर्ट कार्यालयाची पासपोर्ट देण्याची व्यवस्था सुरळीत होणार असल्याचं पासपोर्ट कार्यालयाकडून सांगण्यात आले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.