शीना हत्याप्रकरण: इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला कोलकातातून अटक

शीना बोरा हत्याप्रकरणात स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जींची पत्नी इंद्राणीच्या अटकेनंतर प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागलंय. तर तिकडे कोलकातामधून पोलिसांनी इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला अटक केलीय. 

Updated: Aug 26, 2015, 11:28 PM IST
शीना हत्याप्रकरण: इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला कोलकातातून अटक title=

कोलकाता: शीना बोरा हत्याप्रकरणात स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जींची पत्नी इंद्राणीच्या अटकेनंतर प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागलंय. तर तिकडे कोलकातामधून पोलिसांनी इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला अटक केलीय. 

आणखी वाचा - शीना ही बहिण नाही तर मुलगी होती; इंद्राणीची धक्कादायक कबुली

पीटर मुखर्जी यांनी सांगितलं की, इंद्राणीनं शीनाला आपली बहिण असल्याचं सांगितलं होतं, मात्र ती इंद्राणीची मुलगी होती. पोलिसांना संशय आहे ती, इंद्राणीच्या तिसऱ्या नवऱ्याच्या मुलासोबत शीनाचं अफेअर होतं, त्यामुळंच तिची हत्या झाली.

आणखी वाचा -  माझ्या बहिणीला इंद्राणी मुखर्जीने का मारलं मला माहितीय - मिखाईल बोरा

इंद्राणी आणि शीनाच्या नात्याबद्दल नव्या उलगड्यानंतर पोलिसांनी पीटरची चौकशी केली. तर दुसरीकडे कोलकातामध्येही पोलिसांनी इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्ना याला अटक केलीय. खन्ना २४ परगना (प.बंगाल) मध्ये एक रिसॉर्ट चालवतात.

इंद्राणीनं कबुल केला हत्येचा गुन्हा

दरम्यान, महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे इंद्राणी मुखर्जीनं शीना बोराची हत्या केल्याचं मुंबई पोलिसांकडे कबुल केलंय. रायगडला शीना बोराचा सांगाडा मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास पुढे सरकलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.