ख्रिस्त धर्म म्हणजे हिंदूच... येशू होता तामिळ ब्राह्मण

सुमारे 70 वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका पुस्तकामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.... 

Updated: Feb 23, 2016, 02:36 PM IST
ख्रिस्त धर्म म्हणजे हिंदूच... येशू होता तामिळ ब्राह्मण title=
बाबाराव सावरकर आणि येशू ख्रिस्त

मुंबई : सुमारे 70 वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका पुस्तकामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.... 

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांनी लिहिलेलं 'ख्रिस्त परिचय' हे पुस्तक नव्यानं प्रकाशित केलं जातंय... 

या पुस्तकात येशू ख्रिस्ताबाबत अनेक धक्कादायक दावे करण्यात आलेत. 

ख्रिस्त हा मुळात तमिळ हिंदू, विश्वकर्मा ब्राह्मण होता, असा दावा या पुस्तकात करण्यात आलाय. ख्रिश्चन धर्म स्थापन करणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पूर्वायुष्याबाबत या पुस्तकात अनेक दावे करण्यात आलेत. 

या पुस्तकाविषयी थोडसं

येशू हा भारतीय होता आणि मूळ तामिळ हिंदू ब्राह्मण होता, असा दावा RSS च्या 5 संस्थापकांपैकी एक व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू गणेश (बाबाराव) यांनी 1946 मध्ये लिहिलेल्या "ख्रिस्त परिचय" या पुस्तकात केला आहे. 

कधी होणार पुस्तक प्रकाशन

मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकतर्फे 26 फेब्रुवारी रोजी हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे, ज्यात येशूने काश्मीरमध्ये समाधी घेतल्याचा दावा आहे. येशूने तिथे शंकर आराधना केली. 

भारतात कशासाठी आला होता येशू

पॅलेस्टाईन व अरब भूमी ही पूर्वी हिंदुस्थानचा भाग होती व जीझस (येशू) हे योगा शिकण्यासाठी भारतात आले होते. याच योगा व अध्यात्मिक आधारावर येशू त्यांना सुळी चढविल्यानंतरही जिवंत राहू शकले. नंतर हिमालयातील जडी-बुटींच्या आधारे त्यांचे इलाज केले गेले व त्यांची प्रकृति सुधारली.

येशूचे मूळ नाव काय होते

येशूचे मूळ नाव केशव कृष्णा होते व मातृभाषा तामिळ. येशूचा रंगही काळा-सावळा होता. येशूच्या वडिलांचे नाव जोसेफ हे शेषफ चा अपभ्रंश आहे. शेषफ म्हणजेच शेषप्पा, जे तामिळमध्ये सर्रास वापरले जाणारे नाव आहे.