मुंबई : कल्याण-ड़ोंबिवलीच्या महापौरपदासाठी भाजपकडून अडीच वर्षांचा प्रस्ताव शिवसेनेला देण्यात आलाय. या प्रस्तावावर अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलेय. दरम्यान, शिवसेना आणि भाजपकडून उमेदवार अर्ज भरण्यात आलेय. त्यामुळे पेज वाढण्याची शक्यता आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपनं शिवसेनेसमोर अडीच-अडीच वर्षाचा प्रस्ताव ठेवलाय. अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्यामुळं शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे भाजप खासदार कपिल पाटील यांच्यासोबत भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल दामले महापालिकेत दाखल झालेत. महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच आज अखेरचा दिवस आहे.
कोण आहेत पदाचे उमेदवार?
कल्याण डोंबिवली महापौर पद निवडणुकीत चूरस होण्याची शक्यता आजच्या घडामोडीवरून दिसून येत आहे. राजेंद्र देवळेकर शिवसेनेचे महापौरपदाचे दावेदार आहेत. तर भाजपकडून राहुल दामलेंचे नाव आघाडीवर आहे. तर सेनेकडून दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे यांची नावे आघाडीवर होतीत. मात्र, देवळेकर यांना महापौर तर राजेश मोरे यांना उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.