मुंबई : विधान परिषद निवडणुकीतली चुरस वाढली आहे. मुंबई महापालिकेतल्या दोन जागांसाठी भाजपाही मैदानात उतरणार असल्याची माहीती मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यानी दिली.
भाजपने या निवडणुकीच उडी घेतल्याने काँग्रेस-भाजपामध्ये चुरस वाढली आहे. मुंबई महापालिका विधान परिषद निवडणूक लढण्याचा निर्णय भाजपानं घेतलाय. यासाठी महाराष्ट्र प्रदेश समिती लवकरच उमेदवार निश्चित करेल, असंही ते म्हणाले.
२७ डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या ८ जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये मुंबई महापालिकेच्या २ जागा आहेत. यातली एक जागा शिवसेना सहज जिंकेल. मात्र दुसऱ्या जागासाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.