मुंबई : मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 'साई प्रसाद'या चीट फंड कंपनीशी निगडीत १६ जागांवर छापे टाकले त्यासोबतच पुण्यात 'जीवन समृद्ध्' या चिट फंड कंपनीचे मालक महेश मोतेवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मोतेवार यांचा पासपोर्ट जप्त करण्याच्या प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच 'साई प्रसाद'चे बाबासाहेब भापकर यांच्यावर देखील कार्यवाहीच्या हालचाली सुरु झाल्यात. बोगस चिट फंड कपंन्यांविरोधात सेबी ने सुरु केलेल्या मोहिमेला यामुळे यश मिळतंय.
महेश मोतेवार यांनी लोकांच्या पैशाच्या जोरावर टीव्ही चॅनल्स सुरु केले. याबद्दल देखील केंद्र सरकारनं CBI ला कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.