आता मोबाईलनेच काढा लोकलचं तिकीट

मोबाईलच्या मदतीने तुम्हाला आता लोकलचं तिकीट काढता येणार आहे, यासाठी रेल्वेने 'आर वॉलेट' हा अॅप तयार केला आहे.

Updated: Dec 27, 2014, 06:42 PM IST
आता मोबाईलनेच काढा लोकलचं तिकीट title=

मुंबई : मोबाईलच्या मदतीने तुम्हाला आता लोकलचं तिकीट काढता येणार आहे, यासाठी रेल्वेने 'आर वॉलेट' हा अॅप तयार केला आहे.

मुंबईत रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते या सेवेचं आज उदघाटन करण्यात आलं. यावेळी मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, तसेच खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

 हे अॅप डाऊनलोड केलं की तुम्हाला लोकलचं तिकीट काढता येईल. हे अॅप तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येणार आहे.
 
हे अॅप डाऊन केल्यानंतर, तुमचा मोबाईलनंबर आयआरसीटीसीकडे नोंदवावा लागेल. त्यानंतर ज्या मार्गावर प्रवास करायचा आहे, त्या मार्गाचं तिकीट निवडून, नेट बँकिंगद्वारे तिकीटाची रक्कम भरावी लागेल.
 
नेट बँकींगद्वारे तिकीटाचे पैसे भरल्यानंतर रेल्वेकडून एक मॅसेज येईल. या मॅसेजवरून तुम्ही स्टेशनवरील मशिनद्वारे तिकीटाची प्रिंट काढू शकाल.
 
यापुढे ऑनलाईन पद्धतीनेही होणार स्मार्टकार्ड रिचार्ज
 या सेवेमुळं लोकलचं तिकीट काढण्यासाठीही तुम्हाला रांगेत ताटकळत उभं राहण्याची गरज नाही. याशिवाय मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांसाठीही खुश खबर आहे. कारण स्मार्टकार्ड रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला रांगेत उभं राहण्याची गरज नाही. कारण यापुढे ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही तुमचं स्मार्ट कार्ड रिचार्ज करु शकणार आहात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.