लव्ह मॅरेजसाठी ती कुटुंबाबरोबर भांडली पण...

आपल्या प्रेमासाठी तिने आपल्या कुटुंबियांचा विरोध पत्करला. धमक्यांना भिक घातली नाही. आपल्या प्रेमावर ठाम राहत तिने विवाह केला. मात्र, नियतीला मान्य नव्हते. अवघ्या चार वर्षातच नियतीने सुखी संसार हिरावून घेतला. दुख असताना तिने धाडसी निर्णय घेत अनेकांना नवे आयुष्य दिलेय.

Updated: Jul 29, 2016, 07:10 PM IST
लव्ह मॅरेजसाठी ती कुटुंबाबरोबर भांडली पण... title=

मुंबई : आपल्या प्रेमासाठी तिने आपल्या कुटुंबियांचा विरोध पत्करला. धमक्यांना भिक घातली नाही. आपल्या प्रेमावर ठाम राहत तिने विवाह केला. मात्र, नियतीला मान्य नव्हते. अवघ्या चार वर्षातच नियतीने सुखी संसार हिरावून घेतला. दुख असताना तिने धाडसी निर्णय घेत अनेकांना नवे आयुष्य दिलेय.

हेल्मेट नसल्याने मृत्यूने कवटाळले

सोनिया साटम, असे या महिलेचे नाव आहे. सोनिया हिचे २०१२ मध्ये शेखर साटम याच्यासोबत विवाह झाला. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन तिने हा विवाह केला होता. सोनियाला तिच्या कुटुंबियांनी धमक्याही दिल्या. मात्र प्रेमाखातर तिने हे सर्व सहन केल्या. ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करणारा शेखर रविवारी कामानिमित्त बोरीवली येथे बाईकवरून जात असताना अपघातात झाला. 
 
बाईकवर निघताना शेखरने हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे अपघाताच्यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातस्थळी असणाऱ्या काही जणांनी शेखरला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला अपघाताची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबियांनी अंधेरी येथील रुग्णालयात त्याला हलवले. 

तिचा अवयव दान करण्याचा निर्णय

डॉक्टरांनी शेखरला ब्रेनडेड घोषित केले. सोनियाला काहीतरी चमत्कार घडेल आणि शेखर शुद्धीवर येईल अशी आशा होती. मात्र, ती आशाच ठरली. मोठ्या प्रसंगाला हिमतीने तोंड देत तिने स्वत:ची समजूत घातली आणि शेखरचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. शेखरच्या यकृतामुळे दोन रुग्णांना जीवदान मिळणार आहे. तर नेत्रदानामुळे एकाला नवी दृष्टी मिळणार आहे. 

लग्नाला कुटुंबियांचा विरोध

सोनिया दिल्लीमध्ये एमबीए करत होती. त्यावेळी तिची आणि शेखरची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या लग्नाला सोनियाच्या कुटुंबियांचा विरोध होता. त्यांनी शेखरपासून दूर करण्यासाठी सोनियाला हरियाणाला पाठवून दिले. 

तिला ९ महिने फोनपासून दूर ठेवले. संधी मिळाल्यानंतर तिने शेखरला फोन केला. त्यानंतर शेखर तिला मुंबईत आणले. त्यावेळी तिच्या कुटुंबियांनी वाकोला पोलिस ठाणे गाठले. त्यांनी धमकी दिली. पण मी शेखर बरोबर रहाण्याचा निर्णय घेतला, असे तिचे म्हणणे आहे.