Target Bollywood: आतापर्यंत कोणावर झाले हल्ले? कोणाला मिळाल्या धमक्या?

Attacked On Bollywood Celebrities: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकूहल्ल्यानंतर बॉलिवूडला टार्गेट केलं जात असल्याची एक भावना समोर येऊ लागलीय..

Pravin Dabholkar | Updated: Jan 16, 2025, 09:49 PM IST
Target Bollywood: आतापर्यंत कोणावर झाले हल्ले? कोणाला मिळाल्या धमक्या? title=
टार्गेट बॉलीवूड

Attacked On Bollywood Celebrities: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकूहल्ल्यामुळे बॉलिवडमधून दिग्गज अभिनेत्यांना वारंवार टार्गेट केलं जात असल्याची चर्चा सुरू झालीय. लॉरेन्श बिश्नोई टोळीकडून सलमान खानला आलेल्या धमक्या. सलमाच्या घरावर झालेला गोळीबार.. आणि त्यानंतर आता सैफ अली खानवर झालेला हा जीवघेणा हल्ला.. त्यामुळे या चर्चांना उधाण आलंय. 

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकूहल्ल्यानंतर बॉलिवूडला टार्गेट केलं जात असल्याची एक भावना समोर येऊ लागलीय.. सैफ अली खानवर त्याच्या घरात घूसून हल्लेखोराने सपासप असे 6 वार केले.. या सगळ्यामुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी यावर प्रश्न उपस्थित केलेत.. या आधी अभिनेता सलमान खानला अनेकदा लॉरेन्श बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आलेत. त्यातच सलमानच्या घरावरही गोळीबार करण्यात आला होता.. त्यातच सैफवर झालेल्या या हल्ल्यानंतर बॉलिवूमधील कलाकारांनी चिंता व्यक्त केलीय.. प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी होणं गरजेचं असल्याचं ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी म्हटलंय. फक्त सैफच नाही तर अनेक ठिकाणी अशा घटना घडल्याचं अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी म्हटलंय.. 

सैफ अली खानवर झालेल्या या हल्ल्यानंतर देशभरातील अनेक कलाकारांनी सैफ यातून लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना केलीय.. दाक्षिणात्या सुपरस्टार चिरंजिवी, अभिनेत्री पूजा भट, पुलकीत सम्राट, परिणीती चोप्रा या कलाकारांनी या घटनेनंतर दुख व्यक्त केलंय़. तर वांद्रे भाग अनियंत्रित घटकांच्या हाती लागल्याची टीका रवीना टंडन यांनी केलीय.  'सेलिब्रिटी, सॉफ्ट टार्गेटना लक्ष्य करणं सुरु झालंय...यावर कडक उपायोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. रवीना टंडन यांनी व्यक्त केलीय. याआधीही बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.. 

आतापर्यंत कुणावर झालेत हल्ले? 

1997 साली टी सिरीज चे संस्थापक कुलशन कुमार यांची अंधेरीत गोळी घालून हत्या 

गँगस्टर लॉरेंस बिश्नोई टोळीकडून वारंवार धमक्या येऊ लागल्या. 2024 मध्ये सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करत Y+ सुरक्षा देण्यात आली.

1990 च्या दशकात शाहरुखला अबु सालेमकडून वारंवार धमक्या येऊ लागल्या होत्या. या धमक्या अजूनही सुरूच आहेत.2023 ला महाराष्ट्र सरकारडकून शाहरुखला Y + सुरक्षा देण्यात आली.

राकेश रोशनला 2000 साली सांताक्रुझ इथं राकेश रोशन यांच्यावर 2 हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात रोशन थोडक्यात बचावले. 

अभिनेत्री प्रिती झिंटाला 2001 साली धमकी देण्यात आली. तिच्याकडे 50 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती.

वेगवेगळ्या कारणांसाठी आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना धमक्या आणि हल्ले करण्यात आलेत.. आता सैफ अली खान वरील हल्ल्यानंतर सेलिब्रिटींवर करण्यात आलेल्या हल्ल्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय.. त्यामुळे हल्लेखोराला लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्याती मागणी जोर धरू लागलीय.